Tuesday , February 7 2023

युवा महोत्सवात शरीरसौष्ठव स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त
बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठान, युवा गु्रपच्या वतीने युवा महोत्सव 2019 आयोजित करण्यात आला आहे. पनवेल शहरातील वरदविनायक सोसायटीसमोरील मैदानात सुरू असलेल्या या महोत्सवात शुक्रवारी (दि. 28) ‘उपमहापौर श्री’ ही जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा रंगली. या वेळी भाजप नेते बाळासाहेब पाटील यांची उपस्थिती लाभली.
युवा महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच निरनिराळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्या अंतर्गत शुक्रवारी ‘उपमहापौर श्री’ स्पर्धा रंगली. या वेळी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश प्रभारी संजय कोडगे, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, प्रभाग समिती अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, नगरसेवक मनोहर म्हात्रे, तेजस कांडपिळे, अभिमन्यू पाटील, मनोज भुजबळ, राजू शर्मा, समीर ठाकूर, एसीपी अर्जुन गरड, प्रशांत कदम, जितेंद्र वाघमारे, दिलीप पाटील, शहर सरचिटणीस अमरिश मोकल  यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply