Breaking News

सिद्धगडावर बलिदान दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा

कर्जत ः प्रतिनिधी

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे हुतात्मा झालेल्या वीर हुतात्मा भाई कोतवाल व वीर हुतात्मा हिराजी पाटील यांना आदरांजली वाहण्यासाठी 1 आणि 2 जानेवारी 2020 रोजी सिद्धगडावर विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा व देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती सिद्धगड स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार गोटीराम पवार यांनी दिली.

1 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता वक्तृत्व व समूहगान स्पर्धा होणार आहेत. वक्तृत्व स्पर्धेत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी हुतात्मा वीर भाई कोतवाल व वीर हिराजी पाटील, पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी आझाद दस्त्याचे शिलेदार व जे देशासाठी लढले, आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी धारातीर्थ सिद्धगड व स्फूर्ती सिद्धगडाची व 11वीपासून पुढील खुल्या गटासाठी आझाद दस्ता- स्वातंत्र्यलढ्यातील सुवर्णपान व सिद्धगड ऐतिहासिक लढा- जतन आणि जाणीव हे विषय आहेत, तसेच या चार गटांत समूहगान स्पर्धा होणार आहेत.

अधिक माहिती व नावनोंदणीसाठी योगेंद्र बांगर (9272704744), महेंद्र पवार (8369171505), एकनाथ देसले (9226976798), यशवंत माळी (7020279510) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सिद्धगड स्मारक समितीतर्फे करण्यात आले आहे.

हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांना 2 जानेवारी 1943 रोजी ब्रिटिशांविरोधात लढताना सिद्धगडावर वीरगती प्राप्त झाली. या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारीच्या सायंकाळपासून विविध देशभक्तीपर कार्यक्रम होतात. रात्रभर विद्यार्थी व देशप्रेमी नागरिक मशाली घेऊन सिद्धगडावर येतात. 2 जानेवारीच्या सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी हुतात्मा ज्योत प्रज्वलित करून मानवंदना दिली जाते. ठाणे व रायगड जिल्ह्यातील हजारो देशप्रेमी नागरिक या कार्यक्रमासाठी सिद्धगडाच्या जंगलात उपस्थित असतात.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply