Breaking News

‘आध्यात्मिक साधना सर्व शारीरिक व्याधींपासून दूर ठेवते’

मुरूड ः प्रतिनिधी

मुरूडजवळील डोंगरी गावात श्री स्वामी समर्थ मठ गेली अनेक वर्षे उत्तमरीत्या काम करीत आहे. निसर्गरम्य डोंगरी गावात समुद्रासमोर विशाल अशा मठात हजारो भक्त रोज दर्शनासाठी येतात व स्वामीभक्त त्रिशाताई भक्तांशी संवाद साधतात. त्या स्ववादातून हजारो भक्तांची गार्‍हाणी ही शारीरिक व्याधींची असतात. म्हणूनच त्रिशाताई यांनी मुरूड शहरात माली समाज हॉलवर व्याधीमुक्त जीवनासाठी अध्यात्माची जोड या कार्यक्रमात भक्तांना मानवाची अध्यात्मिक साधना शरीराला व्याधींपासून दूर कशी ठेवते यावर सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी भक्त भावेश शहा, अजित गुरव, नागेंद्र सिंग, मेहुल शहा आदी सर्व उपस्थित होते.

त्रिशाताईंचे स्वागत फुलांच्या वर्षावाने करण्यात आले. कीर्ती भगत यांनी त्रिशाताईंच्या कार्याचा आढावा वाचला व नंतर ताईंचे अध्यत्मिक मार्गदर्शन सुरू झाले. त्रिशाताईंनी व्याधी प्रथम ओळखायची कशी व न घाबरता व्याधींना डॉक्टरी उपायांसोबत ध्यानधारणा करून मानवाच्या व्याधींचे औषध मानवाकडेच आहे हे भक्तांना पटवून दिले. 10 मिनिटांच्या ध्यानधारणेतून भक्तांनी स्वर्गसुख अनुभवले. त्यानंतर व्याधीच्या उपाययोजनेत आपल्या मनावर ताबा कसा मिळवायचा याची प्रात्यक्षिके या वेळी दाखवण्यात आली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply