Breaking News

खोपोली-पेण रस्त्यावर तेलगळती

अनेक वाहने घसरली

खालापूर : प्रतिनिधी

खोपोली-पेण मार्गावर गुरुवारी (दि. 2) सकाळी टँकरमधून तेलगळती होऊन खालापूर तालुक्यातील वडवळ गावाच्या हद्दीतील रस्ता निसरडा झाल्याने अनेक वाहने घसरली. घसरलेल्या वाहनांमध्ये दुचाकींची संख्या जास्त होती. कामगार तसेच परिसरातील वाहनचालकांना या तेल गळतीचा त्रास सोसावा लागला. या तेलगळतीचे वृत्त सोशल मीडिया आणि सामाजिक संस्थेच्या ग्रुपवर प्रसारित होताच वडवळ व आसपासच्या तरुणांनी तसेच सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. व तेलगळती झालेल्या मार्गावर माती पसरवली. त्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply