Breaking News

बेलोशी हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर उत्साहात

पाली ः प्रतिनिधी

को. ए. सो. अ‍ॅड. दत्ता पाटील हायस्कूल बेलोशीत सन 2004-05मधील इयत्ता 10वीमध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर बेलोशी हायस्कूलच्या प्रांगणात उत्साहात झाले. या वेळी अनेक माजी विद्यार्थी -विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. इयत्ता 5 वीपासून ते 10 वीपर्यर्ंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी या वेळी हायस्कूलमध्ये शिक्षण घेताना आलेल्या अडचणींबरोबरच जुन्या आठवणींना उजाळा दिला.

गेट टुगेदरचा कार्यक्रम 10वी इयत्ता सोडून झाल्यानंतर 17 वर्षांनंतर प्रसन्ना पाटील यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी सुमारे 45 ते 46 माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी हजर होत्या. या वेळी याच विद्यार्थ्यांमधील रायगड जिल्हा पातळीवर कुस्ती स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या पहेलवान प्रशांत पाटील यांचा सत्कार माजी विद्यार्थ्यांच्या वतीने जितेंद्र गुंड, प्राची पाटील, अमृता निरकर, प्रसन्ना पाटील, प्रगती धुमाळ, कैलास पाटील यांनी केला.

कोरोना काळात आरोग्यसेविका म्हणून वैद्यकीय सेवा देणार्‍या हर्षला कंटक यांचाही सत्कार विद्यार्थ्यांच्या वतीने प्रियांका पाटील, निशा भगत, रत्नमाला पाटील यांनी केला. याच वर्गातील राकेश पाटील वकील झाल्यामुळे त्यांचाही सत्कार विद्यार्थ्यांच्या वतीने अतिश बनप, गितेश पाटील, महेेश राणे आदींनी केला. तसेच वैशाली मिसाळ पोलीस पाटील झाल्यामुळे त्यांचाही सत्कार विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आला.

अमृता निरकर, गितेश पाटील, महेश राणे, हर्षला कंटक, प्रदीप भोईलकर, अ‍ॅड. राकेश पाटील यांनी भाषणे केली. या वेळी अ‍ॅड. राकेश पाटील म्हणाले की, आपण एकदा शाळेतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपली जबाबदारी विसरतो. कधीतरी शाळेला भेट देणे ही आपली जबाबदारी आहे. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी बेलोशी हायस्कूलसाठी आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य भेट देण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. राकेश पाटील, तर आभार प्रदर्शन अमृता निरकर यांनी केले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply