Breaking News

पोलीस रेझिंग डेनिमित्त विद्यार्थ्यांना वाहतूक नियमनाचे धडे

पनवेल : बातमीदार

वाहतूक नियमांची शाळा स्तरावर निरंतर माहिती विद्यार्थ्यांना असावी यासाठी पोलीस रेझिंग डेनिमित्ताने शनिवारी (दि. 4) शहर वाहतूक शाखेकडून व्ही. के. हायस्कूल आरएसपीच्या इयत्ता सहावी ते आठवीच्या सुमारे 125 विद्यार्थी व विद्यार्थिनींना वाहतूक नियमनाबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते यांनी मार्गदर्शन केले.

वाहतूक नियमनाची जनजागृती सामान्य नागरिकांपर्यंत होत असून परिसरातील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे देण्यासाठी त्याचबरोबर सिग्नलच्या माध्यमातून वाहतूक नियमनाबाबत लोकशिक्षण व समाज प्रबोधन, तेही संस्कारक्षम वयात शालेय माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी वाहतूक पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे, स. पोलीस आयुक्त अरुण पाटील, राजेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.

बेशिस्त वाहतुकीवर अंकुश लावण्यासाठी पोलीस त्यांची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी रोजच झटत असतात. उपलब्ध मनुष्यबळात व साधनसामुग्रीत पोलिसांची धडपड सुरू असते. स्पीड गन, ब्रीथ अ‍ॅनालायझर, क्रेन्स वगैरे आवश्यक असून ते उपलब्ध आहेत. अपघात टाळायचे असतील तर वाहतूक नियमांचे प्रत्येकानेच पालन करणे गरजेचे आहे.      -अभिजित मोहिते,     वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर वाहतूक शाखा

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply