Breaking News

उरण ओएनजीसीकडून जीवनावश्यक वस्तू

उरण : वार्ताहर

कोरोना संसर्ग होऊ नये त्याकरिता सर्वत लॉकडाऊन करण्यात आले आहे. कामानिमित्त आलेल्या गरिबांचे काम बंद झाले आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. काम नसल्याने किराणा व जीवनावश्यक सामान खरेदी करण्यास पैसा नाही. अशा गरिबांना आधार म्हणून उरण येथील ओएनजीसी प्लान्टच्या वतीने उरण तालुक्यातील नवघर गावाजवळील झोपडपट्टीत राहणार्‍या लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप गुरुवारी (दि. 2)  करण्यात आले. गरिबांना तांदुळ, तेल, मूगडाळ, कांदे, बटाटे आदी गृहोपयोगी सामान देण्यात आले आहे. या वेळी ओएनजीसी प्लान्टचे हेड नरेंद्र असिजा, न्हावा-शेवा सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठलराव दामगुडे, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी, सिक्युरिटी  ऑफिसर उत्तम रॉय, सहाय्यक पोलीस निरीक्षक वृषाली पवार, पोलीस नाईक सचिन केकरे, सीआयएफएस अधिकारी व स्टाफ आदी उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply