उरण : प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलीस रेझिंग डेनिमित्त उरण तालुक्यातील सिडकोच्या द्रोणागिरी
नोडमधील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी तालुका वाहतूक पोलिसांमार्फत आयोजित रेझिंग डे कार्यक्रमात येथील वाहन चालकांना इंडियन कॅन्सर सोसायटी संस्थेच्या वतीने डॉ. विशाल पंजाबी यांनी कॅन्सरवर प्रबोधन व जनजागृतीबाबत मार्गदर्शन केले.
तसेच उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांनी वाहतुकीच्या नियमांबाबत माहिती देऊन चालकाने वाहन चालविताना मद्यपान, तंबाखू, गुटखा सेवन करू नये व त्याबाबत होणार्या परिणामांबाबतचे योग्य मार्गदर्शन केले. या वेळी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे व्यवस्थापक गुप्ता व विजय मेहता, उरण वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी यांच्यासह सिमेंट वाहतूक करणारे वाहनचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.