Breaking News

खालापूर तालुका भाजप अध्यक्षपदी मोरेश्वर उर्फ बापू घारे यांची फेरनिवड

खोपोली : प्रतिनिधी

खालापूर तालुका भारतीय जनता पक्ष अध्यक्षपदी मोरेश्वर उर्फ बापू घारे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. या पदासाठी एकूण पाच कार्यकर्ते इच्छुक होते. पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व इच्छुकांना विश्वासात घेऊन ही निवडणूक बिनविरोध झाली असल्याचे निरीक्षक म्हणून काम पाहिलेल्या जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी सांगितले.

छत्तीशी विभागातील होराळे विठ्ठल मंदिर सभागृहात बुधवारी (दि. 8) भाजप खालापूर तालुका अध्यक्षपदाची निवडणूक झाली. या वेळी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोरेश्वर उर्फ बापू घारे यांची बिनविरोध फेरनिवड झाली. अश्विनी पाटील यांनी हे जाहीर करताच उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणा देत निवडीचे जोरदार स्वागत केले. काही कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आपला आनंद साजरा केला.

या वेळी शुभेच्छा देताना जिल्हा चिटणीस शरद कदम म्हणाले की, मोरेश्वर उर्फ बापू घारे यांची खालापूर तालुका मंडळ अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याने कार्यकर्त्यांना आनंद झाला आहे. बापू घारेंवर या जबाबदारीने कामाचा व्याप वाढला आहे. संपूर्ण तालुक्यात भाजपला क्रमांक एकवर नेण्यासाठी आपण कार्यकर्त्यांनी त्यांना सहकार्य करायचे असून यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे.

जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, चिटणीस दीपक बेहरे, उपाध्यक्ष व निवडणूक निरीक्षक अश्विनी पाटील यांनीही कार्यकर्त्यांना पक्षवाढीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले.

बैठकीस भाजपचे कर्जत तालुकाध्यक्ष पंढरीनाथ राऊत, सरचिटणीस सनी यादव, प्रसाद पाटील, तालुका चिटणीस प्रसाद पाटील, दिनेश घाडगे, मोहन घाडगे, संदीप मोरे, रवींद्र पाटील, रवींद्र मोरे, हरिभाऊ जाधव, दिनेश हातनोलकर, मनू पवार, श्रीकांत भोईर, मिलिंद दाभोलकर, आनंद चव्हाण, शशिकांत मोरे, नितीन मोरे, राम वाघमारे, महेश कडू, महिला तालुका मंडळ अध्यक्ष सुजाता दळवी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

खालापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा तालुका मंडळ अध्यक्षपदी मला निवडण्यात आले त्याबद्दल मी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. पक्षाच्या तालुक्यातील नव्या उभारणीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येत कामाला लागू या. -मोरेश्वर उर्फ बापू घारे, अध्यक्ष, खालापूर तालुका मंडळ

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply