Breaking News

‘सीकेटी’त राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

पनवेल ः प्रतिनिधी : खांदा कॉलनी येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाच्या माध्यमातून दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेस सोमवारी (दि. 17) इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे व्हाइस चान्सलर ए. बी. पंडित यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

सीकेटी महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाच्या माध्यमातून सिसेंट इनोव्हेशन अ‍ॅण्ड कर्न्सन ऑफ ग्रीन केमिस्ट्री टूवर्ड्स संस्टेनॅब्लीटी या विषयावर 17 व 18 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

या परिषदेस जयपूर युनिव्हर्सिटीचे स्कूल ऑफ बेसिक सायन्सचे प्रमुख प्राध्यापक आर. एस. लोखंडे, मुंबई विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाच्या डॉ. शिल्पी साचर, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्‍हाटे, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. के. पाटील, डॉ. ज्योत्सना ठाकूर यांसह मान्यवर आणि रसायनशास्त्र विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply