Breaking News

शिक्षकांनी घेतले ‘निष्ठा’चे धडे

म्हसळा : प्रतिनिधी

केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसळा तालुक्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीत शिकविणार्‍या शिक्षकांसह मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांसाठी निष्ठा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. त्यात तीन सत्रांत तालुक्यात 253 जणांना प्रशिक्षण देण्यात आले.

म्हसळ्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या या निष्ठा प्रशिक्षण कार्यक्रमात अध्ययन निष्पत्ती, क्षमता आधारित अध्ययन व मूल्यांकन, शाळा सुरक्षितता व सुरक्षा, वैयक्तिक व सामाजिक गुणवैशिष्ट्ये, आरोग्य व योगा, ग्रंथालय, युवा क्लब, शालेय नेतृत्व गुणवैशिष्ट्ये, किचन गार्डन आदी विषयांवर उत्तम प्रशिक्षण देण्यात आले.

पनवेल येथील ज्येष्ठ अधिव्याखाता महाजन सर, रोहन पाटील, बशीर उलडे, विनोद मुसमुसे, महेश राव, अरविंद मोरे यांनी या वेळी मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख गजानन साळुंखे, म्हसळाचे दीपक पाटील, प्रकाश कोठावळे, बेडके, भोनकर सर आदींनी या तालुका स्तरावरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन, आयोजन व आवश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी पार पाडली.

निष्ठा प्रशिक्षण प्रथम राज्य स्तरावर आणि नंतर तालुका स्तरावर देण्यात आले. जिल्ह्यातील पाच तज्ज्ञ शिक्षक त्यामध्ये दोन भाषातज्ज्ञ, विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयीचे तज्ज्ञ मार्गदर्शक असल्याने प्रशिक्षण गुणात्मक व उत्तम झाले. -गजानन साळुंखे, केंद्रप्रमुख, म्हसळा

Check Also

आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तआदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी …

Leave a Reply