Breaking News

मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी रोहा तालुक्यात निष्ठा प्रशिक्षण

रोहे ः प्रतिनिधी 

 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद  आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद  नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने कोलाड  येथील द. ग. तटकरे माध्यमिक विद्यालयात रोहा तालुक्यातील मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या समग्र प्रगतीसाठी निष्ठा प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. वर्गातील आंतरक्रिया, कृतीयुक्त अध्ययन, शैक्षणिक नेतृत्व विकास एकुणच अध्ययन -अध्यापन याबाबत महत्वपुर्ण भूमिका बजावण्यासाठी निष्ठा प्रशिक्षण राज्यस्तरानंतर  थेट तालुकास्तरावर देण्यात येत आहे. गट शिक्षण अधिकारी सादुराम बांगारे यांच्या हस्तेे या प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन करण्यात आले.  या प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा 6 जानेवारीपासून सुरू आहे. अधिव्याख्याता संतोष दौड यांच्यासह संजय पाटील, मानसी कदम-तावडे, मंगेश चिल्ले, नंदकुमार तेलंगे, सचिन दरेकर हे या शिबिरात मार्गदर्शन करीत आहेत. या शिबिरात प्रत्येक टप्यात तालुक्यातील 150 शिक्षक प्रशिक्षण घेत असून सदर प्रशिक्षण 4 टप्यात घेण्यात येणार आहे. प्रशिक्षण व्यवस्थापक म्हणून श्रद्धा पाटील काम करीत आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply