पनवेल : रामप्रहर वृत्त
डिसेंबरनंतर ओढ्याचे पात्र कोरडे पडते, परिणामी ग्रामस्थांना व जनावरांना वणवण पाण्यासाठी भंटकंती करावी लागत म्हणून मौजे-कल्हे येथील लाडूची वाडी येथे पनवेलच्या महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी विभाग, कृषी कर्मचारी व लोकसहमतातुन बंधारा उभारण्यात आला. या विभागामध्ये लाडूची वाडी, काजू वाडी अशा वाड्या वसल्या आहेत. बंधारा उभारण्यासाठी तेथील शेतकरी काना पवार, कृषीपर्वेक्षक तानाजी दोलतोडे, कृषी सहायक वासुदेव पाटील, प्रसाद पाटील, महेश शेडगे, स्नेहल पाटील, सुवर्णा शिंदे, मनीषा वळसे, देवयानी लवंडे, प्रीती बोराडे, धनश्री लाड इतर कर्मचार्यांनी व ग्रामस्थांपैकी लक्ष्मण बुडाजी पाटील, बाळकृष्ण पाटील (दिघाटी) तसेच इतर कृषीमित्र यांनी सहभाग घेतला.