नेरळ : बातमीदार
माथेरानच्या पायथ्यांशी असलेल्या बेकरे गावातील खांबाया देवाचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिंडी सोहळ्यात लहान मुलांनी पारंपरिक वेशभूषा साकारली होती. हे सर्वांचे आकर्षण बनले होते. दिंडीत बालकांसह ज्येष्ठ नागरिक, तरूण आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. बेकरे गावातील जागृत देवस्थान असलेल्या जय खाबांया देवस्थानचा उत्सव पौष महिन्यांत साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त मंदिरात पहाटे काकड आरती, सकाळी अभिषेक सोहळा, हरिपाठ, भजन आणि सत्यनारायणाची महापूजा अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होते. या वेळी टाळ, मृदूंगाच्या गजरात संपूर्ण बेकरे गावात दिंडी काढण्यात आली होती.