Breaking News

गरजूंना सॅनिटायझर, मास्क, हॅण्डवॉश

पनवेल : बातमीदार

तळोजा येथील 102 बटालियन द्रुत कार्यबल यांच्याकडून गरजूंना कोरोना विषाणूच्या बचावासाठी हॅन्ड सॅनिटायझर, मास्क, हँडवॉश, हॅन्डग्लोज आणि फिनायल यांचे वाटप सोमवारी करण्यात आले. या वेळी 102 बटालियनचे कमांडंट राजेश कुमार, उप कमांडंट मोहम्मद रजी, पनवेलचे तहसीलदार अमित सानप आणि मंडळ अधिकारी श्रीकांत मोरे उपस्थित होते. या वेळी बटालियनचे चिकित्सा अधिकारी डॉ.  श्रीकांत मर्कड यांनी कोरोनाचा बचाव कसा करायचा याची माहिती दिली व लॉक डाऊनच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी त्यांनी सांगितले. जर अत्यावश्यक काम असेल तरच घरातून बाहेर निघा व मास्क लावूनच आपण कोरोना विरोधात लढू शकतो, असे सांगितले. तसेच एकमेकांमध्ये अंतर ठेवा व आपल्या घराजवळचा परिसर स्वच्छ ठेवा, असे सांगत कोणालाही शारीरिक समस्या असेल तर त्यांनी जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply