Breaking News

खरीप हंगाम स्पर्धेत शेतकर्यांचा मोठा सहभाग

कर्जत : बातमीदार

खरीप हंगामात शेतकर्‍यांना प्रोत्साहित करण्यासाठी भातपीक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून कशेळे मंडळात मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांनी स्पर्धेत भाग घेतला आहे. भातपीक स्पर्धेत सहभागी होणार्‍या स्पर्धकांच्या शेतात कृषी अधिकारी पोहचले असून शेतीशाळेच्या निमित्ताने तेथे परीक्षण केले जात आहे. कर्जत तालुक्यातील कशेळे मंडळांतर्गत नेवाळी येथे खरीप हंगाम 2019-20 राष्ट्रीय गळीत धान्य अभियान अंतर्गत तालुका कृषी कार्यालयाच्या शेतीशाळेचे नियोजन करण्यात आले होते. त्या शेतीशाळेच्या शेवटच्या टप्प्यात कृषी पर्यवेक्षक सचिन केने, कृषी सहाय्यक शिवाजी लोहकरे आणि सुदिन पाटील यांनी शेतीशाळा घेताना शास्त्रीय पध्दतीने पीक कापणी व कीड नियंत्रण याविषयी मार्गदर्शन केले. शेतकर्‍यांचा मोठा प्रतिसाद लाभलेल्या या शेतीशाळांमध्ये भात बियाणे निवड, बीजप्रक्रिया, बीज संस्करण, चारसूत्री लागवड पध्दतींची गरज आणि त्यानंतर शेतकर्‍यांमध्ये तांत्रिक साक्षरता विकसित करून विविध कीड तसेच रोगांवर फवारणीसाठी औषधांची फवारणी याबाबत माहिती देण्यात आली. पिकांच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत शेतकर्‍यांच्या प्रश्नांना वेगवेगळ्या सत्रांत उत्तरे देण्यात आली. कृषी अधिकार्‍यांनी भातपीक स्पर्धेत सहभागी शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी करून आणि  वेगवेगळी निरीक्षणे घेऊन उत्पादन वाढीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी प्रकाश सापळे यांनी घरच्या घरी बनवण्याचे प्रात्यक्षिक आणि वैभव विळ्यांच्या मदतीने कापणी प्रात्यक्षिक घेण्यात आले. शेतीशाळेस नेवाळी येथील युवा शेतकर्‍यांचाही चांगलाच प्रतिसाद होता. ही शेतीशाळा कर्जत येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे कृषी पर्यवेक्षक सचिन केने, कृषी सहाय्यक शिवाजी लोहकरे व सुदिन पाटील यांनी घेतली. शेतीशाळेसाठी रामचंद्र भागीत, मारुती दुर्गे, चिंधू भागीत यांसह येथील शेतकरी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply