Breaking News

दर्पण प्रकाशनातर्फे पुस्तक प्रकाशन समारंभ

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईच्या दर्पण प्रकाशनाच्यावतीने पुस्तक प्रकाशन समारंभाचे आयोजन बुधवारी (दि. 22) सायंकाळी पाच वाजता मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान येथे केले आहे.

ज्येष्ठ पत्रकार, लेखिका नीलाताई उपाध्ये यांनी लिहिलेल्या आणि दर्पण प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित होत असलेल्या, ‘चुनाभट्ट्यांचा इतिहास आणि आगरी समाज’, या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. समारंभाचे अध्यक्ष इतिहास संशोधन परिषदेचे रवींद्र लाड, विशेष अतिथी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणुन अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथ पाटील, कार्याध्यक्ष जे. डी. तांडेल, शेतकरी नेते मधुकर भोईर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, स्थानिय इतिहास तज्ञ राहूल चेंबूरकर, मुंबई विद्यापीठ मराठी विभागाच्या अल्का मटकर यांची उपस्थिती लाभणार आहे. या समारंभाचे आयोजक ‘आगरी दर्पण’चे संपादक दीपक म्हात्रे हे आहेत.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply