Breaking News

अध्यापनात अद्ययावत तंत्रज्ञान आवश्यक, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचे मत

पाली : प्रतिनिधी

प्रगत व अद्ययावत तंत्रज्ञानानुसार अध्यापनात बदल करणे काळाची गरज असल्याचे मत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी पाली

(ता. सुधागड) येथे व्यक्त केले.

 कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी आपल्या कोकण दौर्‍यादरम्यान पाली येथील शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयास भेट दिली. यावेळी कुलगुरू, प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी यांच्यात विविध विषयांवर चर्चासत्र घेण्यात आले. त्यात कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर मार्गदर्शन करीत होते. विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य घडविण्यासाठी स्पर्धा परीक्षा अत्यंत महत्वाच्या असल्याची जाणीव त्यांना करून दिली पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

आजकाल अध्ययन प्रक्रिया अधिकाधिक आनंददायी व कृतीयुक्त बनली आहे. टॅॅब स्कूल, डिजीटल स्कूलच्या माध्यमातून शाळांचा दर्जा उंचावत आहे. आता या स्पर्धात्मक जगात आम्ही शिक्षण आणि तंत्रज्ञान यात फरक करु शकत नाही. शिक्षक व प्राध्यापकांनी आपल्या अध्यापनातील काही मिनिटे विद्यार्थ्यांशी हितगुज करण्यावर घालवून करियरच्या वाटा व सामाजिक जाणिव यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन झाल्यास ते अधिक उपयुक्त ठरेल असे कुलगुरू डॉ. पेडणेकर यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला  सुएसोचे अध्यक्ष वसंतराव ओसवाल, उपाध्यक्ष रवींद्र लिमये, प्राचार्य युवराज महाजन यांनी कुलगुरूंचे स्वागत केले. यावेळी विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान शाखा अधिष्ठाता डॉ. मुजुमदार, कला शाखा अधिष्ठाता डॉ. खरात, उपप्राचार्य सुधीर पुराणिक, वाणिज्य विभाग प्रमुख एम. एस. लिमन, डॉ अंजली पुराणिक यांच्यासह प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

शिक्षकाची जागा यंत्रमानवाने घेतली आहे. अशावेळी शिक्षकाने आपले नावीन्य दाखवून आधुनिकतेला स्पर्श करून अध्यापन केले पाहिजे. विद्यार्थ्यांना केवळ डिग्री देऊन चालणार नाही, तर त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर दिला पाहिजे. -डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply