अलिबाग : प्रतिनिधी
तालुक्यातील वेश्वी येथे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व ओमकार क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत जय हनुमान चरी संघाने विजेतेपद पटकाविले.
अलिबागसह पेण, पनवेल, उरण, रोहा, कर्जत असे 62 संघ सहभागी झाले. अंतिम सामन्यात जय हनुमान चरी संघाने श्री विठ्ठल कोपरपाडा संघाला दोन गुणांनी पराभूत केले. नवयुवक खिडकी व गणेश क्लब बोकडवीरा या संघांनी तृतीय क्रमांक मिळवला.
सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून चरी संघाच्या राहुल भोईरला गौरविण्यात आले. बोकडवीरा संघाच्या त्रिशूल ठाकूरला उत्कृष्ट चढाई, तर श्री विठ्ठल कोपरपाडाचा सचिन पाटीलला उत्कृष्ट पकडीचे पारितोषिक देण्यात आले. आदर्श खेळाडू म्हणून ऋषिकेश नाईकला गौरविण्यात आले. खिडकी संघाचा प्रणित पाटील पब्लिक हीरो ठरला.
ओमकार क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, उपाध्यक्ष जितेंद्र शेळके, सचिव गिरीश शेळके, खजिनदार महेंद्र राऊळ, राकेश राऊळ, अमोल नलावडे, अॅड. प्रशांत राऊळ, निलेश नलावडे, प्रसाद मगर, गजानन मगर, पदाधिकारी व सदस्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …