Breaking News

नेरळ रेल्वे फाटकातील रस्त्यामधील लोखंडी सळया बाहेर

रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

कर्जत : बातमीदार

नेरळ रेल्वे स्टेशनच्या कर्जत बाजूकडे असलेल्या फाटकामधील  डांबरी रस्त्यामधून लोखंडी सळया बाहेर आल्या आहेत. त्या सळया फाटकातून रूळ ओलांडणार्‍या दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या चाकात घुसत असून त्या गाड्यांचे टायर निकामी ठरत असल्याचे सातत्याने घडत आहे. नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेने याबाबत सातत्याने आवाज उठवूनदेखील त्या सळया तोडून टाकण्याचे काम मध्य रेल्वे प्रशासन करताना दिसत नाही. मुंबई-पुणे या मेन लाइनवरील नेरळ गावात दोन्ही भाग जोडणार्‍या रेल्वे फाटकात वाहनांची कोंडी होत असते. या वाहतूक कोंडीमध्ये वाहने जोराने दामटवण्याचा प्रयत्न वाहनचालक करीत असतात. त्या वाहनचालकांच्या गाडीचे टायर सतत पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले आहे. फाटकात रेल्वेमार्गाच्या बाजूला लोखंडी सळया जमिनीतून बाहेर आल्या असून त्या कापून काढण्याचे काम होत नाही. त्यामुळे वाहनचालकांना दररोज त्रास सहन करावा लागत असून, या प्रकारामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. या ठिकाणी बाहेर निघालेल्या लोखंडी सळया बाजूला करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply