Breaking News

माणगाव कुणबी समाज संघटनेतर्फे गुणगौरव सोहळा, वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

माणगाव : प्रतिनिधी

माणगाव शहर कुणबी समाज संघटनेची सर्वसाधारण सभा शनिवारी (दि. 27) येथील कुणबी भवन सभागृहात झाली. तालुका कुणबी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष महादेवराव बक्कम यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत गुणवंत विद्यार्थी, कृषिनिष्ठ शेतकरी आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या कुणबी बांधवांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष कृष्णा पानवकर यांनी केले तर सूत्रसंचालन सचिव संतोष मालोरे व नेहा सतिष केकाणे यांनी केले. नगरसेविका रिया उभारे, नंदिनी बामगुडे, सुशीला वाढवळ, रश्मी मुंढे, तसेच शांताराम खाडे महाराज, पोलीस उपनिरीक्षक संजीव साखरे, नगरपंचायतीचे ओएस सुनील बुटे, राष्ट्रीय खेळाडू ऋषिकेश मालोरे, पत्रकार राम भोस्तेकर, मंजुषा चव्हाण, प्रगतशील शेतकरी रमेश शिंदे, काशीराम पालकर, व्यावसायिक विजय शिंदे, समाजसेवक सत्यजित भोनकर, विधी कॉलेजचे प्राचार्या सोनाली बुरटे पाटील, डॉ. गौरी उभारे यांच्यासह दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई अध्यक्ष भूषण बरे,  नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार व नायब तहसीलदार संजय माने, पं. स. माजी सभापती संगीता बक्कम, माजी सदस्य शैलेश भोनकर, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, काका नवगणे, भागोजीबुवा डवले, बाळकृष्ण काप, नीता करकरे, नितिन खडतर, काशिराम पाखुर्डे, सखाराम खरंगटे यांच्यासह समाजबांधव या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनेचे कृष्णा पानवकर, संतोष मालोरे, संदीप अर्बन, बळीराम चव्हाण, दिलीप ढेपे, सतिष केकाणे, अनिल शिर्के, अनिल अंबावले, विठोबा शिंदे, विश्वास मरवडे, संदेश नाडकर, भारत वाढवळ, अनंत दळवी, शंकर उभारे, दिनेश खडतर, बळीराम खडतर, नितीन उभारे, दामोदर शिंदे, सीताराम भोनकर, प्रकाश खिडबिडे, प्रकाश उभारे, रमेश उभारे, सतीश ढेपे, सखाराम पवार, मणिराम मुंढे, नंदकुमार जाधव, भालचंद्र खाडे, सखाराम सत्वे, जनार्दन वडेकर, आर. टी. पवार यांच्यासह सर्व सदस्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. जनार्दन वडेकर यांनी आभार मानले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply