पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राजमाता जिजाऊ यांची जयंती आणि राष्ट्रीय युवा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर त्याच बरोबरकार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ.वसंत बर्हाटे, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील व इतर शिक्षकवृंद उपस्थित होता. कार्यक्रमाच्या सुरूवातीला राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविकामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सुर्यकांत परकाळे यांनी स्वयंसेवकांना व्यापक दृष्टीकोन, वाचनाचे महत्त्व त्याचबरोबर सामाजिक योगदान देण्याचे आवाहन केले. कार्यक्रम अधिकारी प्रा. सत्यजित कांबळे यांनी सर्व आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सुर्यकांत परकाळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. सत्यजित कांबळे, प्रा. गणेश साठे, प्रा. सागर खैरनार, प्रा. अपूर्वा सजयगे, प्रा. भागयश्री भगत, प्रा. संजय हिरेमठ (डॉ. सी. डी. देशमुख सेंटर )
व इतर शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या कार्यांचे अवलोकन करून त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत. तसेच व्यक्तिमत्व विकासातून सामाजिक परिवर्तन होणे शक्य आहे. युवकांनी रुढी, परंपरा झुगारुन समक्ष भारत घडविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होऊन आपले योगदान द्यावे.
– जमीर लेंगरेकर, उपायुक्त, पनवेल महानगरपालिका