उरण : वार्ताहर
उरणचे आमदार महेश बालदी यांच्या आमदारकीला एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षपूर्तीचे औचित्य साधून उरण नगर परिषद हद्दीतील आनंदनगर येथील रस्ता व गटारे यांचे भूमिपूजन शनिवारी (दि. 24) भाजप तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, नगरसेवक राजेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी आनंद नगर येथील श्रीराम अपार्टमेंट, श्री गणेश अपार्टमेंट व मयुरा सोसायटीचे ग्रामस्थ उपस्थित होते. उरण नगर परिषद नगरसेवक, नगरसेविका, भाजप उरण तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, दिनेश घरत, राजेश माळी, राजेश गावडे, भास्कर मोकळ आदी उपस्थित होते.