Breaking News

स्वातंत्र्य दिनानिमित्त नेरळ भाजपकडून वृक्षारोपण

कर्जत : बातमीदार

अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजपच्या वतीने  नेरळमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. नेरळ शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी नेरळ मोहाचीवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये वृक्षारोपण करून स्वातंत्र दिन साजरा केला. या वेळी भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष, तसेच नेरळ ग्रामपंचायत सदस्य मंगेश म्हसकर, नेरळ शहर अध्यक्ष अरुण नायक, उपाध्यक्ष हर्षल कुलकर्णी, शखेश गदिया, सरचिटणीस प्रवीण गायकवाड, राहुल मुकणे, हेमंत मेस्त्री, पराग गायकवाड, अशोक चंचे, चेतन केलकर, संतोष धुले नासिर अन्सारी, योगेश ठक्कर, नेरळ ग्रामपंचायतचे माजी सदस्य संजय माधवाणी, तसेच सुशील सुर्वे, संभाजी गरूड, मिलिंद साने, दिनेश पेठकर, जावेद जळगावकार यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक या वेळी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply