Breaking News

विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

सावरकर चौक-अमरधाम रस्त्याचे काँक्रीटीकरण

पनवेल : वार्ताहर

पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या प्रभागात असलेल्या सावरकर चौक ते अमरधाम रस्त्याच्या काँक्रीटीकरणा संदर्भात महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे. पनवेल शहरातील महत्वाच्या असलेल्या रस्त्यापैकी प्रमुख रस्ता म्हणजे अमरधाम ते सावरकर चौक हा रस्ता आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. त्यामुळे पाणी साचून अपघात होत आहेत. तसेच लोकांना ये-जा करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात शाळा, कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी, कोर्टाकडे जाणारे वकील व पक्षकार तसेच जवळ असलेले पोलीस ठाणे त्यामुळे या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. या रस्त्याचे काँक्रीटीकरण करावे अशी मागणी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी 2017 सालापासून त्यांनी महानगरपालिकेकडे केली होती. व त्यासाठी प्रत्यक्षात पाठपुरावात केला होता. आजमितीस या कामाला मंजूरी मिळून प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात आली आहे.

Check Also

महापालिका कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्य -माजी सभागृह नेते परेश ठाकूर

म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेळावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मेळावा म्युन्सिपल एम्प्लॉईज …

Leave a Reply