Breaking News

पेणमध्ये पतंग महोत्सवाची धूम

पेण : प्रतिनिधी

पतंग महोत्सवाच्या माध्यमातून महिलांना प्रेरणा देण्याचे काम होत असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी पेण येथे केले. महिला अत्याचार विरोधी मंच व अंकुर ट्रस्ट यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या पतंग महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात नगराध्यक्षा पाटील बोलत होत्या.

स्त्री शिक्षणाचा पाया रचण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी त्यावेळी केल्यामुळे आज स्त्रियांना समाजात ताठ मानेने जगता येत आहे. स्त्रियांनीही विविध क्षेत्रात आता उंच भरारी घेतली असून, आपल्या कार्यातून त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे, असे  नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी आगळा महिला पतंग महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. पतंगोत्सवापुर्वी पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात रंगीबेरंगी पतंग एका हातात धरून पेण शहरात महिला व तरूण मुलींनी भव्य रॅली काढली होती. महात्मा गांधी वाचनालयापासून निघालेल्या रॅलीचा समारोप पेण नगरपालिका मैदानात करण्यात आला. यावेळी समाजसेविका वैशाली पाटील, वर्षाताई शेळके, माजी नगरसेविका धनश्री समेळ, माजी माहिती अधिकारी वाघ मॅडम, नीता कदम, कैसर मॅडम, आदिंसह अनेक महिला उपस्थित होत्या.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply