Breaking News

कळंबोलीत रस्ता सुरक्षा अभियानात महिलांचा पुढाकार

पनवेल, कळंबोली : प्रतिनिधी

कळंबोली वाहतूक विभाग व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षा सप्ताह अंतर्गत एक रॅली सुरक्षिततेसाठी कार्यक्रमाचे आयोजन गुरूवारी (दि. 16) करण्यात आले होते. सकाळी 10 ते 11 च्या दरम्यान कळंबोली, कामोठे, खांदा कॉलनी या मार्गे कळंबोळी वाहतूक कार्यालयात या हेल्मेट बाईक रॅलीची सांगता झाली. या रॅली मध्ये 80 महिला सहभागी झाल्या होत्या. यात बालविकास नवी मुंबई प्रकल्पाच्या आशा पाटील, स्त्री शक्ती फाऊंडेशन अस्मिता सामाजिक संस्थाच्या अ‍ॅड. सुलक्षणा जगदाळे, मराठा समाज मंडळ खारघरच्या राजश्री कदम, प्रगती महिला मंडळाच्या संगीता सुर्वे, नेहा पाटील, पोलीस मित्रच्या वृषाली शेडगे, जिजाऊ महिला मंडळाच्या अ‍ॅड. संतोषी चव्हाण, रुचा ड्रायविंग सेंटर खारघर व रॉयल जिम क्लब अशा अनेक  सामाजिक संस्थानी सहभाग नोंदविला. आजच्या रस्ता सुरक्षा हेल्मेट बाईक रॅली अभियानात वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहन चालकांवर पोलिसांनी रीतसर कारवाई करून सुरक्षेचे महत्त्व समजावून हेल्मेट सक्ती का असावी याबद्दल पोलीस निरीक्षक राजू शेजवळ यांनी माहिती दिली. वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर यांनी रस्ता सुरक्षा सप्ताहाचा उद्देश याविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की, हेल्मेटमुळे जीवावर आलेले संकट तारून नेले जाते तेव्हा हेल्मेट वापराची सक्ती घरातून झाली पाहिजे. हेल्मेट सक्तीचे करूनही अनेकजण नियम तोडत आहेत. समाजसेविका विजया चंद्रकांत कदम यांनी सामाजिक बांधिलकी जपत ज्या महिला बाईक रॅलीसाठी हजर राहिलेल्या महिलांचे आभार मानले. आपणच आपली काळजी घ्यावी. सुरक्षेतेच्या दृष्टीने हेल्मेट वापरा अपघात टाळा महत्वाचे आहे याविषयीचे मत व्यक्त केले.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply