दोघांचा मृत्यू; 269 रुग्णांना डिस्चार्ज
पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 21) कोरोनाचे 292 नवीन रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 269 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत दिवसभरात 229 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे, तर 214 रुग्ण बरे झाले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 63 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला तर 55 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात नवीन पनवेल सेक्टर 11, पद्यप्रिया सोसायटी येथील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोमवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 30 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2757 झाली आहे. कामोठेमध्ये 37 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3676 झाली आहे. खारघरमध्ये 61 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 3458 झाली आहे.
नवीन पनवेलमध्ये 45 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3070 झाली आहे. पनवेलमध्ये 52 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3017 झाली आहे. तळोजामध्ये चार नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 714 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 16692 रुग्ण झाले असून 14192 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.02 टक्के आहे. 2129 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 371 जणांचा मृत्यू झाला आहे.
उरण तालुक्यात नऊ जणांना संसर्ग
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी – उरण तालुक्यात सोमवारी नऊ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची नोंद करण्यात आली. तर दिवसभरात पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये गोवठणे, ओम साई अवेन्यू, साई सदन द्रोणागिरी, कोळीवाडा, बाजारपेठ, विंधणे, नवापाडा, जसखार, दत्त कृपा निवास वैभव लक्ष्मी सोसायटी येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये बोकडवीरा, सोनारी, करंजा रोड दर्गावाडी, खोपटे पाटीलवाडी, बोकडविरा येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1746 झाली आहे. त्यातील 1459 बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 201 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत 86 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.