Breaking News

पनवेल तालुक्यात आढळले 398 नवे रुग्ण

तिघांचा मृत्यू; 250 जणांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 6) कोरोनाचे 398 नवीन रुग्ण आढळले असून तीन जणांचा मृत्यू  झाला आहे तर 250 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 292  नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर 180 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 106 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर 70 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे सेक्टर 5 मारुती टॉवर आणि सेक्टर 34 श्री शिव शंकर टॉवर येथील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 39 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2250 झाली आहे. कामोठेमध्ये 84 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2878 झाली आहे. खारघरमध्ये 47 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 2653 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 69 नवीन रुग्ण आढळल्याने  तेथील रुग्णांची संख्या 2463 झाली आहे. पनवेलमध्ये 46  नवीन रुग्ण आढळल्याने  तेथील रुग्णांची संख्या 2341 झाली आहे. तळोजामध्ये सात नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 635 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 13220 रुग्ण झाले असून 11244  रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.05 टक्के आहे. 1662 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 314 जणांचा मृत्यू झाला आहे.

उरण तालुक्यात 20 नवे पॉझिटिव्ह

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी

उरण तालुक्यात रविवारी कोरोनाचे 20 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून सहा रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये किलबिल बंगला खोपटे बांधपाडा चार, नवीन शेवा दोन, ठाकूर आळी जसखार, राधे कृष्ण मंदिराजवळ चीर्ले, मोरा मच्छी मार्केट उरण, भेंडखळ समाज मंदिराजवळ, बोरी नाका उरण, कोळीवाडा, भेंडखळ, करंजा नवापाडा, कोटनाका, कुंभारवाडा, विंधणे, एसबीआय उरण, बाजारपेठ, मोहिनील सिएचएस म्हातवली नागाव उरण येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.       

महाडमध्ये 34 जणांना लागण

महाड : प्रतिनिधी

महाड तालुक्यात रविवारी कोरोनाचे 34 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 25 जनांनी कोरोनावर मात केली आहे. महाडमध्ये 250 कोरोनाचे रुग्ण उपचार घेत असून, 865 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आतापर्यंत 1161 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

कर्जत तालुक्यात 31 रुग्णांची नोंद

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत तालुक्यात रविवारी नवीन 31 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 1021 झाली आहे. तसेच एकूण 771 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 45 वर गेली आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये मोहाची वाडी तीन, नेरळ व कर्जत शहर प्रत्येकी दोन, नानामास्तर, आमराई, वृंदावन गार्डन, दहिवली, मुद्रे बुद्रुक, गुंडगे, उकरूळ, डिकसळ, गुढवण, सुगवे, नालधे, उमरोली, बांधिवली, वरई-मानिवली, वडवली, बोरिवली, चिंचवली, कडाव, कोल्हारे, खाड्याचा पाडा, मुळगाव, आवळस, खांडपे येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

नवी मुंबईत 335 जणांना संसर्ग

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबईत रविवारी 335 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे नवी मुंबईतील  कोरोना बधितांची एकूण संख्या 28 हजार 214 झाली तर 348 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने बरे झालेल्यांची 23 हजार 938 झाली आहे.  दिवसभरात सात जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 630 झाली आहे. आढळलेल्या रुग्णांची विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 62, नेरुळ 51, वाशी 57, तुर्भे 59, कोपरखैरणे 49 घणसोली 29, ऐरोली 27, दिघा एक, अशी आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply