पनवेल ः रायगड जिल्ह्यात शनिवारी(दि. 24) नव्या 163 रुग्णांची आणि चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 179 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 98 व ग्रामीण 31) तालुक्यातील 129, अलिबाग 11, पेण नऊ, रोहा पाच, माणगाव चार, खालापूर दोन आणि उरण, कर्जत व महाड तालुक्यातील प्रत्येकी एका समावेश आहे, तर मयत रुग्ण पनवेल (मनपा दोन, ग्रामीण एक) तालुक्यात तीन आणि अलिबाग तालुक्यात एक असे आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता 53,095 आणि मृतांची संख्या 1522 झाली आहे. 49,872 जण कोरोनामुक्त झाल्याने 1791 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
तळोजा मजकूरमध्ये शिवरायांच्या मंदिराचा वर्धापन दिन
तळोजा : रामप्रहर वृत्ततळोजा मजकूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा पहिला वर्धापन दिन रविवारी …