पनवेल : रामप्रहर वृत्त
बँक ऑफ महाराष्ट्र नवी मुंबई झोनने पनवेल शहरातील ओरायन मॉल येथे नुकतेच ऋण एक्सपोचे यशस्वी आयोजन केले होते. या प्रसंगी बँकेच्या विविध ऋण योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
या वेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रधान कार्यालय पुणेचे उप महाप्रबंधक सुभाष सिंह, नवी मुंबई झोनचे झोनल मॅनेजर, अनिलदत्त राजे, ओरायन मॉलचे संस्थापक मंगेश परुळेकर, बँकेच्या सहाय्यक महाप्रबंधक विद्या कुलकर्णी, विविध भाषांचे शाखा प्रबंधक दिनेश परमार, दत्तात्रय कावेरी, श्रीमती अनीता, निधी शर्मा, गीता वर्दम, चंदन कुमार, वाघमारे, राजेश कुमार, विजयकुमार पाटील, विष्णू कांबळे, रजनीश जयस्वाल, पटनाईक यांच्यासह मोठ्या संख्येने ग्राहक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्र संचालन व आभार प्रदर्शन अरविंद मोरे यांनी केले.