उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील कळंबूसरे येथील सचिन तांडेल मेमोरियल फाऊंडेशन सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्रीडा आणि तेरणा ब्लड बँक नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त बुधवारी (दि. 15) रक्तदान शिबिर कलंबूसरे येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये झाले. या रक्तदान शिबिरामध्ये 29 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सचिन तांडेल मेमोरियल फाऊंडेशन ही संस्था सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत असून, अनेक उपक्रम राबविण्यात ही संस्था अग्रेसर आहे. यामध्ये आरोग्य शिबिर, विद्यार्थ्यांना शाळेउपयोगी वस्तूंचे वाटप, मखर स्पर्धा तर कोल्हापूर सारख्या ठिकाणी जाऊन पूरग्रस्तांना मदत अशा अनेक सामाजिक क्षेत्रात काम करत आहे.
या रक्तदान शिबिरासाठी सहाय्यक आयुक्त सेंट्रल जीएसटी डिपार्टमेंट शंकर बिराजदार, मंगला बिराजदार, कलंबूसरे ग्रामपंचायतीच्या सरपंच नूतन नाईक, उपसरपंच सुनील पाटील, डॉ. प्रकाश मेहता, महिला पोलीस सुप्रिया ठाकूर, सदस्य उमेश भोईर महेश राऊत, तारा नाईक राजेंद्र राऊत, तंटा मुक्ती अध्यक्ष रामचंद्र पाटील, उद्योजक कुलदीप नाईक, सामाजिक कार्यकर्ते, प्रकाश पाटील, कुमार पाटील, रत्नाकर राऊत, शाम पाटील, पत्रकार मिलिंद खारपाटील आदी उपस्थित होते.