आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत
चौक : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाची सर्वसमावेशक कार्यप्रणाली आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेश बालदी यांच्या विकासकार्यावर आकर्षित होऊन अनेकांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश होत आहे. यालाच अनुसरून खालापूर तालुक्यातील चौक तारापूर येथील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या आणि वावर्ले येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार महेश बालदी यांनी सर्वांचे स्वागत केले.
भाजप उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे व खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे चौक तारापूर येथील दीपक माळी, गजानन भोईर, निशांत फुलावरे, निखिल गरूडे, अंकिता मकी, अलका माळी, अरुणा भोईर, कुणाल माळी, विनीत माळी या प्रमुख कार्यकर्त्यांसह अन्य कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला, तर वावर्ले येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदोष भद्रिके, सामाजिक कार्यकर्ते मनोहर कडू, रमेश भद्रिके यांच्यासह अनेक जण भाजपमध्ये दाखल झाले.
तारापूर आणि वावर्ले येथे झालेल्या या कार्यक्रमांना भाजपचे खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, चौक शहर अध्यक्ष गणेश कदम, उपाध्यक्ष सागर ओसवाल, रामदास ठोंबरे, सचिन साखरे, सचिन चौधरी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार महेश बालदी यांच्यासह अन्य मान्यवरांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले.