Breaking News

विसपुते स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : बातमीदार

श्री ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळ, नवी मुंबई संचलित बापूसाहेब डी. डी. विसपुते प्री प्रायमरी व प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी बेटी बचाव व बेटी पढाव अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्रजी फडके, पोलीस निरीक्षक मधुकरभोगे, कक्ष अधिकारी मंत्रालय सुरेशअंबेकर संस्थेचे चेअरमन दादासाहेब धनराज विसपुते व सचिव संगिता विसपुते, मुख्याध्यापिका डॉ. अरिफा शेख, इतर विभागाचे प्राचार्य कार्यक्रमासाठी उपस्थित होते. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

स्नेहसंमेलनात  1200 विद्यार्थी व पालकांनी उस्फुर्त सहभाग घेतला प्रसंगी प्रमुख अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सरस्वती पूजन करण्यात आले. प्रमुख अतिथींच्या मार्गदर्शनपर भाषणात बेटी बचाव व बेटी पढाव अभियानचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्रजी फडके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply