Tuesday , February 7 2023

परिवहन विभागाला आकर्षक क्रमांकातून करोडोंचा महसूल

पनवेल : बातमीदार

सन 2019 या वर्षात पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाला आकर्षक क्रमांकातुन 4 कोटी 61 लाख 97 हजार 500 रुपयांचा महसूल मिळाला आहे. तर नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहन चालकाकडून 7 कोटी 96 लाख 52 हजार 663 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2019 दरम्यान प्रादेशिक परिवहन विभागाने 6 हजार 793 वाहनावर कारवाई केली. यात दुचाकी, चारचाकी, ट्रेलर, ट्रक, टेम्पो, रिक्षा यांचा समावेश आहे. तर 832 गाड्या कागद पत्राअभावी व अन्य करणमुळे जमा केल्या. या वाहन चालकाकडून 7 कोटी 96 लाख 52 हजार 663 रुपयांचा दंड वसूल केला व त्यांच्याकडून 6 कोटी 92 लाख 51 हजार 121 रुपयांचा कर असा एकूण 14 कोटी 89 लाख 3 हजार 784 रुपयांचा दंड व कर घेण्यात आला.

पनवेल शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरात नवीन वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असून, यात दुचाकी वाहनांची वाढ लक्षणीय आहे. त्यातही सणाला मोठ्या प्रमाणावर नवीन वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. गाडीपेक्षा गाडीचा नंबर दुसर्‍यांचे लक्ष कसे वेधून घेईल याकडे कल व एकाच क्रमांकाच्या गाड्या याचा फायदा प्रादेशिक परिवहन विभागाला होतो. त्यामुळे गाडी रजिस्टर होताना आरटीओ विभागात पैसे मोजून चांगला व्हीआयपी क्रमांक घेण्यासाठी वाहनधारकांची रीघ लागलेली असते. व्हीआयपी क्रमांकातून प्रादेशिक परिवहन खात्याला करोडो रुपयांचा महसूल मिळालेला आहे.

दर महिन्याला वाहनांच्या संख्येत वाढ होत असते. 2 लाख 75 हजार 161 दुचाकी, 1 लाख 25 हजार 56 चार चाकी गाड्या, 32 हजार 310 तीन चाकी रिक्षा, 12 हजार 790 टुरिस्ट वाहने, 2 हजार 655 बसेस, 72 हजार 294 ट्रक, टेम्पो, ट्रेलर, 3 हजार 303 जेसीबी, पोकलेन यांची संख्या आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने दिसू लागलेली आहेत. 

आकर्षक क्रमांकाच्या माध्यमातून शासनाला महसूल मिळतो. तसेच नागरिकांना ही आपल्या आवडीचा क्रमांक मिळतो. पैसे भरल्यानंतर आवडीचा क्रमांक मिळतो. फ्लाईंग स्कॉड वर्षभर कारवाई करत असतो.

-हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Check Also

फॉर्म हरवलेला पक्ष

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडण्यापासूनच वादाला तोंड फुटले होते. आता निकाल लागून पाच दिवस …

Leave a Reply