रेवदंडा ः प्रतिनिधी
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बेलोशी ग्रामपंचायतीच्या वतीने हद्दीतील 1000 सर्वसामान्य, गरजू व आदिवासी कुटुंबीयांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. बेलोशी ग्रामपंचायत सरपंच कृष्णा भोपी व ग्रामपंचायत सदस्यांनी हद्दीत घरोघरी जाऊन कोरोनाविषयक जनजागृती करून मास्कचे वाटप केले. बेलोशी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित कार्यक्रमास अलिबाग प्रांताधिकारी शारदा पोवार, रेवदंडा पोलीस ठाणे इन्चार्ज पोनि. सुनील जैतापूरकर, खानाव एकात्मता माथाडी कामगार अध्यक्ष अनंता गोंधळी, गटविकास अधिकारी पाटील, माजी पं. स. सदस्य श्रीधर भोपी, पंचायत समिती सदस्या ताई गडकर, बेलोशी ग्रा. पं. सरपंच कृष्णा भोपी, उपसरपंच शालिनी निगडे, ग्रा. पं. सदस्य गिरीष पाटील, भास्कर भोपी, भरत गावंड, संदीप भोईर, उज्ज्वला सांदणकर, वर्षा काटले, प्रचिती पाटील, गीतांजली पारंगे, बाळाराम शिंदे, सदानंद नाईक, गणिती कारभारी, जयवंती नाईक, ग्रामविकास अधिकारी सदावर्ते, राकेश भोपी तसेच बेलोशी ग्रामस्थ उपस्थित होते.