Breaking News

सुधीर नाझरे यांना दोन सुवर्णपदके

मुरूड : प्रतिनिधी

राजस्थानमधील जोधपूर येथे झालेल्या पाचव्या इंटरनॅशनल सर्किट फोटो स्पर्धेत मुरूडचे सुधीर नाझरे यांच्या दोन छायाचित्रांना गोल्ड मेडल प्राप्त झाले आहे. त्याच्या या दोन छायाचित्रांना जागतिक स्पर्धेत सहभाग मिळाला असून, विविध विषयांवर काढलेली 17 छायाचित्रे प्रदर्शनासाठी निवडली गेल्याने नाझरे यांचे नामवंत छायाचित्रकारांकडून अभिनंदन केले जात आहे.

झोतपूर इंटरनॅशनल क्लबच्या वतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत आस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा, डेन्मार्क, इंग्लड, जर्मनी, टर्की, पोलंड, साऊथ आफ्रिका, अमेरिका आदी 16 देशांचे छायाचित्रकार सहभागी झाले होते. सुधीर नाझरे यांच्या पटणंकोंडली (कोल्हापूर) येथील वीर देवाच्या महोत्सवातील हळदीचा भंडारा आणि जेजुरी गडावरील  प्रवासिक छयाचित्रांना गोल्ड मेडल मिळाले आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply