Breaking News

रेवदंडा ते बेलकडे रस्ता चकाचक

साइडपट्टीला स्वच्छतेचा लूक; श्रीसदस्यांचे भरीव श्रमदान

रेवदंडा ः प्रतिनिधी

स्वच्छतादूत ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने रेवदंडा ते बेलकडे मुख्य रस्त्यावर रविवारी (दि. 19) सकाळी श्रीसदस्यांकडून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामुळे रेवदंडा-बेलकडे मुख्य रस्ता चकाचक होऊन साइडपट्टीला स्वच्छतेने वेगळाच लूक प्राप्त झाला. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राबविलेल्या स्वच्छता अभियानात श्रीसदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन श्रमदान केले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रेवदंडा ते बेलकडे मुख्य रस्त्यावर स्वच्छता अभियानास रविवारी सकाळी सात वाजता प्रारंभ झाला. स्वच्छता अभियानात पंचक्रोशीतील असंख्य श्रीसदस्य रस्त्यावर उतरले होते. रेवदंडा ते बेलकडे स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने श्रीसदस्यांनी रेवदंडा पुलापासून थेट बेलकडेपर्यंतच्या मुख्य रस्त्यावर हातात झाडू, कोयता आदी स्वच्छतेचे साहित्य घेऊन श्रमदान केले. रेवदंडा साळाव पूल, रेवदंंडा बाजारपेठेतील मुख्य रस्ता, पारनाका, रेवदंडा हायस्कूल, चौल रामेश्वर, चौलनाका, चौल मुखरी गणपती, चौल सागमळा, चौल बागमळा, पालव, नागाव बायपास रस्ता ते थेट बेलकडेपर्यंतचा परिसर श्रीसदस्यांनी श्रमदानाने चकाचक केला. रेवदंडा ते बेलकडे रस्त्यावरील साइडपट्टीवरील गवत, उनाड झाडेझुडपे तसेच रस्त्यावर अवास्तव वाढलेल्या झाडांची सफाई करण्यात आली. असंख्य श्रीसदस्य एकदिलाने झोकून काम करीत असल्याचे दिसून आले. सकाळी सात वाजता सुरू झालेले स्वच्छता अभियान 10 वाजेपर्यंत सुरू होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply