Wednesday , February 8 2023
Breaking News

नेने कन्या विद्यालयास पुरस्कार जाहीर

पेण : प्रतिनिधी

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल पेण एज्युकेशन सोसायटीच्या सौ. म. ना. नेने कन्या विद्यालयाला इंडियन टॅलेंट सर्चतर्फे महाराष्ट्र् समाजभूषण हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या शाळेतील शिक्षक सहकार्‍यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिल्यामुळे परिसरातील शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा उंचावल्याने त्याची दखल घेऊन नेने कन्या विद्यालयालाची या पुरस्कारासाठी निवड  झाली आहे. सौ. म. ना. नेने कन्या विद्यालय ही विविध क्षेत्रांत सहभागी होणारी संस्था असल्यामुळे जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांकडून माहिती घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला आहे. शाळेव्यतिरिक्त विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मिळविलेल्या गुणवत्तेनुसार उदा. शिष्यवृत्ती परीक्षा, टीएमव्ही, इंग्रजी, गणित, संस्कृत परीक्षा, एमटीएस व एनटीएस परीक्षा या विविध गुणवत्तेमुळे कोणतीही शिफारस न होता गुणवत्तेच्या आधारावर हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष मंगेश नेने, कार्याध्यक्ष बापूराव आठवले, खजिनदार संजय कडू, सेक्रेटरी प्रशांत ओक, सदस्य सुधीर जोशी, ललित  पाटील, समीर साने, किरण देव, सदस्या ज्योती राजे, पूनम शहा, प्रशासकीय अधिकारी एस. व्ही. भट, तज्ज्ञ संचालक दिगंबर चिंचणीकर, मुख्याध्यापिका प्रतिमा पटवर्धन व शिक्षकांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply