Breaking News

घरफोडी करणारे सराईत गजाआड

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

मूळ उत्तरप्रदेशचे असलेले दोन मित्र नशीब आजमावण्यास मुंबईत आले, मात्र त्यांनी कष्ट करण्यापेक्षा पैसा कामावण्यास शार्टकटचा अवलंब केला. एक घरफोडी केली यशस्वी झाली आणि मग घरफोडी करणे नित्याचेच झाले. यासाठी त्यांनी पुणे नवी मुंबई आणि मुंबईत येत होते, मात्र नेरूळ पोलिसांच्या सतर्कतेने त्यांना अटक करण्यात यश आले.  सौरभ देवशरण यादव (वय 24 वर्षे), तौफिक हावसी शेख (वय 24) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

कायम पत्ता बदलणारे आरोपींनी सध्या मीरा भाईंदर येथे मुक्काम ठोकला होता. नेरूळ पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या घरफोडीचा तपास करीत असताना काही ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज मध्ये दोन्ही आरोपी आले होते. त्यांचे फोटो खबर्‍यांना देण्यात आले. या प्रयत्नांना यश आले व हे दोन्ही आरोपी शिरवणे येथे असल्याचे समोर आले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कडे घरफोडी करण्याचे साहित्य मिळुन आले आहे. त्यांना पोलिसी हिसका दखवत चौकशी केली असता नेरूळ पोलीस ठाणे हद्दीतच त्यांनी गेल्या काही महिन्यापासून सहा घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांनी सांगितलेल्या घरफोडीची शहानिशा केली असता या सहाही घरफोडीबाबत गुन्हा नोंदवण्यात आला असल्याचे निदर्शनास आले.

नेरूळ येथील गुन्ह्यातील त्यांच्याकडून अंदाजे 200 ग्रॅम वजनाचे सोन्याचे आठ लाख रुपयांचे दागिने व पाच हजारांचा टॅब असा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक आरोपी हे सराईत घरफोडी करणारे आहेत. आरोपींविरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत. दाखल गुन्ह्यांचा तपास करण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply