Monday , January 30 2023
Breaking News

जेएनपीटीमध्ये बंदर चालक परवाना सेलचे उद्घाटन

उरण : प्रतिनिधी

जेएनपीटीचे चेअरमन आयएएस संजय सेठी यांच्या हस्ते  जेएनपीटी येथील नॉर्थ गेट कॉम्प्लेक्स येथे बंदर चालक परवाना(पीडीपी) सेलचे उदघाटन करण्यात आले.  जेएनपीटी-सीआयएसएफ कडून जारी करण्यात आलेल्या पहिल्या सहा बंदर चालक परवान्याचे  वितरण मालवाहतूक करणार्‍या अवजड वाहनांच्या चालकांमध्ये करण्यात आले.  यावेळी सर्व टर्मिनल ऑपरेटर्स, वाहतूक संस्था यांचे प्रतिनिधी, जेएनपीटीचे व सीआयएसएफ चे वरिष्ठ अधिकारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. बंदराच्या आवारात प्रवेश करणार्‍या अवजड वाहनांच्या वाहनचालकांना बंदर चालक परवाना (पीडीपी) देण्यात येते.  जेएनपीटी-सीआयएसएफच्या पीडीपी सेलकडे आवेदन करणार्‍या प्रत्येक वाहनचालकाला त्याच्या वाहन चालवण्याच्या परवान्याची, आणि त्याने घेतलेल्या सुरक्षा प्रशिक्षणाची चाचणी घेतल्यानंतर हे परमिट देण्यात येते. बंदर चालक परवाना वाहनचालकाला गाडी बंदराच्या आवारात प्रवेश करतांना गाडीवर लावणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी प्रवेश करतांना चालकाला गेटवर आपली ओळख दाखवण्याची गरज नाही.  जेएनपीटीच्या ईझ ऑफ डुईंग बिझनेस उपक्रमा अंतर्गत ही मोहिम सुरू करण्यात आली असून यामुळे अवजड वाहनांची वाहतूक लवकर होण्याबरोबरच पासेस देण्याची प्रक्रियाही यामुळे सोपी होऊ शकेल. यामुळे वाहन गेटवर किमान वेळ थांबल्याने गेटवर वाहतूक कोंडीही होणार नाही. बंदर चालक परवाना देण्याआधी जेएनपीटीचा सुरक्षा विभाग हा जेएनपीटी टर्मिनल्समधील सर्व सुरक्षा कक्षांबरोबर काम करून सुरक्षा प्रशिक्षण देणार आहेत. यामध्ये संपूर्ण बंदराचा नकाशा असून यामध्ये वैद्यकीय सेवा, अग्निसुरक्षा व अन्य सुविधांची माहिती एका प्रशिक्षण कार्यक्रमात देण्यात येणार असल्याने बंदराची सुरक्षा अधिक बळकट होण्यास मदत होईल. जेएनपीटीतर्फे सातत्याने नाविन्य आणत कार्य वाढवण्यावर भर दिला जात असून यामुळे केवळ जागतिक स्तरावरील सुरक्षे बरोबरच ग्राहकांना अजोड अनुभव मिळून त्यांचा व्यवसाय ते व्यवस्थितपणे करू शकतील. या प्रयत्नांमुळे जेएनपीटीला भारता करता वर्ल्ड बँकेच्या ईझ ऑफ डुईंग बिझनेस इंडेक्स अतर्गत चांगले मानांकन त्यांच्या ‘ट्रेडिंग क्रॉस बॉर्डर्स’ विभागा अंतर्गत मिळाले आहे.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply