पनवेल : बातमीदार
महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पनवेल कॉलेजचे एनसीसी युनिट व 6 महाराष्ट्र एनसीसी बटालियन मुंबई ए ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन गार्ड ऑफ ऑनर व ड्रिल स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले होते. या वेळी स्पर्धेतून एनसीसी कॅडेट्समध्ये एकता, अनुशासन, राष्ट्रप्रेम वआत्मविश्वास वृंधिगत होते. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता वृंधिगत होते. असे मत कर्नल राजेश जगताप यानी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी महाविद्यालयाची वाटचाल व भविष्यातील रणनीतीवर भाष्य केले. लवकरच महाविद्यालयात आद्ययावत इनडोअर रायफल शूटिंग रेंज उभारण्यात येईल व त्याचा फायदा एनसीसी युनिट व 6 महाराष्ट्र एनसीसी बटालियन मुंबई ए ग्रुपच्या सर्व महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट्सना होईल अशी माहिती दिली. मुंबई विद्यापीठातर्फे बेस्ट एनएसएस युनिट अवॉर्ड दिला जातो. त्याचप्रमाने बेस्ट एनसीसी युनिट अवॉर्ड 6 महाराष्ट्र एनसीसी बटालियन मुंबई ए ग्रुपने देखील सुरु करावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. या स्पर्धेमध्ये गार्ड ऑफ ऑनर व ड्रिल या दोन्ही प्रकारात महात्मा फुले एएससी कॉलेजच्या एनसीसी युनिटनी प्रथम क्रमांक पटकाविला. ड्रिलमध्ये द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक सीएचएम कॉलेज उल्हासनगरच्या एनसीसी युनिटनी पटकावले तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज महाडच्या एनसीसी युनिटनी पटकावले. त्याचप्रमाणे गार्ड ऑफ ऑनर स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज महाडच्या एनसीसी युनिटला मिलाले. तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जेएसएम कॉलेज अलिबागच्या कॅडेट्सनी मिळविले. स्पर्धेत एकूण आठ महाविद्यालयातील 200 पेक्षा जास्त एनसीसी कॅडेट्सनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनसीसी प्रमुख कॅप्टन रामदास जमनूके याने केले, तर सूत्रसंचालन डॉ. प्रफुल्ल वशेणीकर व डॉ. लिना मेश्राम यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विकास दोरगे, अनिल भांडवलकर, कॅडेट बोबडे यांनी परिश्रम घेतले.