Breaking News

पीएमसी बँकेतील खातेदारांचा पैसा सुरक्षित -आरबीआय

मुंबई : प्रतिनिधी

पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेतील खातेदारांचा पैसा सुरक्षित आहे. केंद्रीय बँकेचे गव्हर्नर त्यावर लक्ष ठेवून आहेत, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मंगळवारी (दि. 22) स्पष्ट केले. पीएमसी बँकेतील खातेदारांशी झालेल्या बैठकीत हा निर्वाळा देण्यात आला. याबाबत केंद्र सरकार अधिक माहिती देणार असून, यासंदर्भात 27 ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याचेही आरबीआयच्या अधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे पीएमसीच्या खातेदारांना दिलासा मिळाला आहे. आंदोलक खातेदारांशी आरबीआयने संवाद साधला. या बैठकीत 19 मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

Check Also

परेश ठाकूर यांची महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

पनवेलसह रायगडच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनची (एमबीए) ८४वी चतुर्वार्षिक …

Leave a Reply