नागोठणे : प्रतिनिधी
राज्य क्रीडा व युवक क्रीडा संचालनालय, रायगड जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने देण्यात येणारा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार नागोठण्यातील भरत प्रल्हाद गुरव यांना जाहीर झाला आहे. यापूर्वी गुरव यांना सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गुणवंत खेळाडू व रायगड जिल्हा परिषदेकडून रायगडभूषण पुरस्कार मिळाला आहे.
क्रीडा क्षेत्रात जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडविणार्या प्रशिक्षकास गुणवंत क्रीडा मार्गदर्शक हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. रोख 10 हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी अलिबाग येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात घेण्यात येणार्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. नागोठणे येथील गुरव कुटुंबातील तिन्ही भावांनी सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा बहुमान गुणवंत खेळाडू व उत्कृष्ट मार्गदर्शक हे पुरस्कार मिळवले आहे.
Check Also
पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्या प्रयोगशाळांवर कारवाई करणार
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्या …