Breaking News

पनवेल मनपाच्या पोदी शाळेत क्रीडा महोत्सव

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या वतीने पोदी (नवीन पनवेल) शाळेत क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आले होता. या महोत्सवातील स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन प्रतिसाद दिला.
महोत्सवाचे उद्घाटन नगरसेवक व शाळेचे माजी विद्यार्थी अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या हस्ते झाले. या वेळी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांनी मोबाइल गेम खेळण्याऐवजी मैदानात जाऊन खेळ खेळून आपले शरीर व मन सुदृढ, प्रसन्न करावे. मैदानी खेळांमुळे शरीराला व्यायाम तर होतोच, शिवाय नेतृत्वगुणांनाही वाव मिळतो असे सांगून आपली आवड व छंद जपा म्हणजे भावी आयुष्यात नक्की यशस्वी व्हाल, असेही ते पुढे म्हणाले.    
उद्घाटन समारंभास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिव्या भारती, शिक्षणतज्ज्ञ राकेश भुजबळ, शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षक उपस्थित होते.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply