Tuesday , February 7 2023

आर. सी. तांबेंचा अमृत महोत्सवी सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त

आर. सी. तांबे यांनी बौध्दजन पंचायत समितीच्या माध्यमातुन कार्य करताना आपला संसार आणि रिझर्व बँकेची नोकरी संभाळून धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षैत्रात उत्कृृष्ठ अशी कामगिरी करुन आपल्या समाजाला योग्य त्या दिशेने नेण्यास मदत करीत आहेत. म्हणूनच ते आज समाजात अत्यंत लोकप्रिय झालेले आहेत. असे गौरवौद्गार बौध्दजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांनी काढले. बौद्धजन पंचायत समिती, नवी मुंबई विभाग क्र. 54,55, 56 व 57 यांच्या विद्यमाने बौ. पं. समितीचे उपसभापती रघुनाथ चिमाजी ऊर्फ आर. सी. तांबे यांचे वयाच्या 75 व्या वर्षात पदार्पण झाल्याप्रितर्थ शनिवारी (दि. 25) त्यांचा अमृत महोसत्वी जाहीर सत्कार सोहळा वाशी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये समितीचे माजी सभापती प्रा. रमाकांत यादव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी उपमहापौर अविनाश लाड, बौ. पं. समितीचे कार्याध्यक्ष किशोर मोरे, उपकार्याध्यक्ष सी. डी. जाधव, सरचिटणीस लक्ष्मण भगत, चिटणीस गजानन तांबे, खजिनदार मनोहर मोरे, गट प्रतिनिधी विलास पवार, प्रकाश जाधव, 15 गाव जनता सेवा संघ मुंबईचे माजी अध्यक्ष सुरेश पालांडे, खेड तालुका बौध्द समाज संघाचे माजी चिटणीस डी. ए. जाधव, नवी मुंबईतील वाशीपासून ते पनवेलपर्यंत कार्यरत असलेल्या बौ. पं. समितीच्या सर्व शाखांचे पदाधिकारी, महिला-पुरुष सभासद, मुंबई,  ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातून आर. सी. तांबे यांचे चाहते आदींनी उपस्थित राहून सत्कारमुर्ती तांबे यांच्या कार्याचा गौरव करुन शुभेच्छा दिल्या.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply