श्रीगाव : प्रतिनिधी : अलिबाग तालुक्यातील मेढेखार येथे गावदेवी क्रीडा मंडळाच्या वतीने आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने प्रौढ गटाची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा नुकतीच रंगली. या स्पर्धेत शहापूरच्या म्हसोबा संघाने बाजी मारली.
स्पर्धेत एकूण 32 संघ सहभागी झाले होते. द्वितीय क्रमांक श्री विठ्ठल कोपरपाडा, तृतीय व चतुर्थ क्रमांक अनुक्रमे श्री गणेश दिवलांग व मातृछाया कुर्डूस या संघांनी मिळविला. मालिकावीर अक्षय पाटील (शहापूर), उत्कृष्ट चढाईपटू गौरव पाटील (कुर्डूस) यांनाही गौरविण्यात आले.
या स्पर्धेस भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते, प्रवक्ता मिलिंद पाटील, अलिबाग
तालुका सरचिटणिस परशुराम म्हात्रे, कुर्डूस विभागीय अध्यक्ष अमित पाटील आदींनी सदिच्छा भेट देत खेळाडूंना प्रोत्साहन दिले. स्पर्धेदरम्यान परिसरातील विविध क्षेत्रांतील गुणीजनांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण यू मुम्बा संघाचे फिजीयो टोपीवाला यांच्या हस्ते करण्यात आले.