Monday , February 6 2023

मूकबधिर टेबल टेनिसपटू कार्तिकची गरूडझेप!

पनवेल : रामप्रहर वृत्त : नवीन पनवेल येथील मूकबधिर असलेला टेबल टेनिसपटू कार्तिक पचेत्ती याने कोल्हापूर येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद मूकबधिर टेबल टेनिस स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले असून, चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आयोजित राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाला गवसणी घातली आहे. 

टेबल टेनिस या खेळात चपळाईबरोबर एकाग्रतेला खूप महत्त्व असते. त्याचबरोबर आवश्यक असते ती कलात्मकता व अचूक निर्णय घेण्याची क्षमता. कौशल्याचा हा खेळ असल्याने तो शिकविणे अवघड असते. मूकबधिर मुलांना शिकवणे तर तारेवरची कसरतच ठरते. त्यासाठी प्रशिक्षकाला मूकबधिर मुलांची भाषा शिकणे गरजेचे असते, परंतु शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस प्रशिक्षक संजय कडू यांनी आजपर्यंत 30 हजार टेबल टेनिस खेळाडूंना दिलेल्या प्रशिक्षणाच्या अनुभवानुसार मूकबधिर कार्तिक पचेत्ती याला या खेळाचे प्रशिक्षण दिले आणि या वर्षी कार्तिक पचेत्तीने राज्य आणि राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सुयश संपादन करून गरूडझेप घेतली आहे.

नवीन पनवेल येथे राहणारा कार्तिक नववीत शिकतो. कार्तिकने घेतलेल्या भरारीबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply