Tuesday , February 7 2023

सुपर डायमंड मार्शल आर्टचे राज्यस्तरीय स्पर्धेत सुयश

नागोठणे ः प्रतिनिधी
येथील सुपर डायमंड मार्शल आर्टच्या खेळाडूंनी अलिबागेत नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत फाईट आणि काता या प्रकारांमध्ये चमकदार कामगिरी करीत पदकांची लयलूट केली.
स्पर्धेत नागोठण्याच्या संघातील अनिश पालकरला बेस्ट फायटर, तर सुमेध गायकवाड याला बेस्ट प्लेयर म्हणून सन्मानित करण्यात आले. सर्व खेळाडूंना संघटनेचे अध्यक्ष धनंजय जगताप आणि प्रशिक्षक रोहन रोडेकर यांचे मार्गदर्शन मिळाले होते.
पदकप्राप्त खेळाडू : शौर्य रसाळ व अनिश पालकर प्रत्येकी दोन सुवर्ण, सुमेध गायकवाड एक सुवर्ण व एक रौप्य, ओवी मढवी एक सुवर्ण व एक कांस्य, वेद फडतरे एक सुवर्ण, आदित्य उतेकर, श्रेयस शेडगे व बजरंग ठाकूर, प्रत्येकी एक रौप्य व कांस्य, श्रीयश शेडगे, पुष्कर गायकवाड, अनुज शिंदे प्रत्येकी एक रौप्य रुचल जाना, सोहा मेहता, श्रुती सिंह व एलिना रॉय, प्रथमेश देशमुख, कौतिक राऊत, अथर्व शेट्टी, रोहित गायकवाड व अक्षय मांडवकर प्रत्येकी दोन कांस्य.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply