Breaking News

मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरवायचे का? -शेलार

मुंबई ः प्रतिनिधी
पोलिसांची तयारी नसतानाही नाइट लाइफचा निर्णय लादला. तज्ञ समितीने आरे कारशेडचा दिलेला अहवाल बंधनकारक नाही म्हणे. मग आता नुकसान सहन करून मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरवायचे का? एक दिवस युवराजांनी मला म्हातारीचा बूट हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं!, अशा शब्दांत भाजप नेते आमदार आशीष शेलार यांनी राज्याचे पर्यावरणमंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
मुंबईतील वादग्रस्त मेट्रो-3चे कारशेड इतर ठिकाणी हलवणे व्यवहार्य नसून आरे कॉलनीतील जागाच कारशेडसाठी योग्य असल्याची शिफारस चारसदस्यीय समितीने आपल्या अहवालात केली आहे. हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला असून, आरेतील कारशेडला विरोध दर्शवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष्य लागले असताना हा अहवाल राज्य सरकारसाठी बंधनकारक नाही, अशी प्रतिक्रिया
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
आदित्य ठाकरे यांच्या प्रतिक्रियेवर भाजप नेते आमदार आशीष शेलार यांनी टीका केली आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील अन्य नेत्यांचाही समाचार आपल्या खास शैलीत घेतला आहे.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply